Subscribe
to our newsletter
आम्ही गेल्या 20 वर्षांपासून डेस्क टॉप पब्लीशींग व्यवसायात आहोत. अनेक मान्यवर लेखकांनी लिहीलेल्या पुस्तकांची टाईपसेटींग, मुखपृष्ठ व अंतर्गत रचना आम्ही केली आहे. संस्कृत, मराठी, गुजराती, हिंदी व इतर भाषांमधील पुस्तकांची निर्मिती आम्ही केली आहे. ‘पुस्तकांच्या राज्यात’ या पानावर आम्ही केलेल्या काही रचनांची माहिती व छायाचित्रे संग्रहीत केली आहे.
किमान 1 प्रत ते 1,000 प्रतींच्या पटीत आवश्यकतेनुसारआमच्याकडे दर्जेदार पुस्तके तयार आणि मुद्रित करू शकता. तुम्हाला तुमचे पुस्तक प्रकाशित करण्यात आम्ही मदत करतो. टाईपसेटींग, मुखपृष्ठ, मुद्रितशोधन यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू शकतो.
मासिके, साप्ताहिके किंवा वार्षिक नियतकालिके देखील प्रकाशित करण्यासाठी आम्ही आपणास मदत करू शकतो. आपले साहित्य आम्ही किंडल सारख्या जागतीक प्लेटफॉर्मवर नेऊन ओळख निर्माण करण्यास मदत करतो. या लेखा सोबत आम्ही केलेली किंडल प्रकाशनाची अमेझॉन लिंक या पेजवर जोडली आहे. अमेझॉनवरून हे पुस्तक आपण आपल्या किंडल अथवा मोबाईल टॅबमध्ये डाऊनलोड करून वाचू देखील शकता. या पुस्तकाची प्रिंटेड कॉपी देखील उपलब्ध आहे. आमच्या संपर्कसूत्रांवर फोनद्वारे याची मागणी नोंदवू शकता.
संपूर्ण वैदिक संस्कृतमध्ये तयार केलेले संहित स्त्रोत्रावली हे पुस्तक असो अथवा मराठीमध्ये १४ पेक्षा जास्त देशांची प्रवासवर्णने असोत ही सर्व पुस्तके आम्ही तयार केली आहे याचा आम्हाला अभिमान आहे. या पुस्तकांच्या प्रती पहाण्यासाठी / वाचण्यासाठी आमच्या कार्यालयाला भेट द्या.